Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वांद्रे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी विनय दुबे याला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे.

आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. टाळेबंदी दरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर ठेवला आहे. विनय दुबेनं ‘चलो घर की ओर’ मोहीम सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं. यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं.

स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.

Exit mobile version