Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवीन कोरोनाविषाणू (कोविड-19) सद्य :स्थिती व उपाययोजना

पुणे : दि. 15/04/2020 रोजी विभागातील 68 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी, 3 कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू, विभागातील एकुण रुग्ण संख्या 472, ॲक्टीव रुग्ण संख्या 362.

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 472 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण संख्या 362 आहे. विभागात कालच्या अहवालानंतर दि.15/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालाआहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकीसर्व 3 जण  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.

  1. दि. 15/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 73 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनीआ व किडनी विकार होता.

2) दि. 15/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 34 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

3) दि. 15/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआसह मायोकार्डीटीस विकार होता.

अ. क्र.             जिल्हा / मनपा बाधीत रुग्ण मृत्यू
1 पुणे 427 39
4 सातारा 11 2
5 सोलापूर 2 1
6 सांगली 26 0
7 कोल्हापूर 6 0
एकुण 472 42

 

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6236 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते, त्यापैकी 5943 चा अहवाल प्राप्त आहे. 293 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5427 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 472 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 33,93,921 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 1,30,29,012 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 787 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Exit mobile version