Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाउन सुरू झाल्यापासून सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 1.27 कोटीहून अधिक दुर्बल / भिकारी / बेघर व्यक्तींसाठी केली मोफत जेवणाची व्यवस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (10 एप्रिल 2020 पर्यंत) 1.27 कोटीहून अधिक निराधार / भिकारी / बेघर व्यक्तींना भोजन देण्याची व्यवस्था सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने मोठ्या महानगरपालिकांच्या साहाय्याने केली आहे. भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यासाठी मंत्रालयाने एका प्रकल्पात यापूर्वीच दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू, लखनऊ, नागपूर, पाटणा आणि इंदूर ही दहा (10) शहरे निवडली आहेत. या योजनेत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश / स्थानिक शहरी संस्था आणि स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या सहकार्याने अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांचे पुनर्वसन करणे, वैद्यकीय सुविधांची तरतूद करणे, समुपदेशन, शिक्षण, कौशल्य विकास इत्यादी उपक्रम अभिप्रेत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 100% सहाय्य देण्यात येणार आहे.

कोविड -19 च्या उद्रेकानंतर आणि देशभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्य परिस्थितीत अनेक लोक भीक मागण्यात गुंतले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उपासमारीमुळे या भटक्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असणार. हे लक्षात घेता, अशा भिकारी आणि भटक्या लोकांना मोफत शिजलेले भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी खाद्य केंद्रे सुरू करण्याच्या सूचना दहा शहरांच्या महानगरपालिकांना देण्यात आल्या आहेत. या व्यवस्थेमुळे भविष्यात सर्वसमावेशक राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत येणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्यात मदत होईल.

ज्या निराधार / भिकारी / बेघर व्यक्तींना शिजवलेले जेवण पुरवलेले आहे त्याचे शहरानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेतः

अनुक्रमांक शहराचे नाव मोफत जेवण दिलेल्यांची संख्या (लाखात)
1 दिल्ली 75.0
2 मुंबई 9.8
3 कोलकाता 1.3
4 चेन्नई
5 बंगळुरू 14.0
6 हैदराबाद 7.0
7 नागपूर 0.8
8 इंदूर 8.4
9 लखनौ 7.0
10 पटणा 0.5
  एकूण

 

127.30

 

Exit mobile version