अत्यावश्यक मालाचा सुरळीत पुरवठा व्हावा म्हणून छोट्या पार्सल्सची जलद एकत्रित मालवाहतुक करण्याठी भारतीय रेल्वेची रेल्वे पार्सल व्हॅन सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यानच्या लॉकडाऊनमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, अन्नधान्य यांसारख्या महत्वाच्या अत्यावश्यक सामुग्रीची लहान पार्सल्सची वाहतूकही महत्वाची, गरजेची आहे. ही गरज भागवण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-कॉमर्स सेवा पुरवठादार तसेच राज्यसरकारे यांना जलद एकत्रित मालवाहतुकीसाठी रेल्वे पार्सल व्हॅन सुविधा उपलब्ध करुन द्यायचे ठरवले आहे. अत्यावश्यक मालाचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी ठराविक मार्गावर वेळापत्रकानुसार विशेष पार्सल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष पार्सल रेल्वे सेवेसाठी मार्ग सूचवण्याची तसेच उपलब्ध करुन देण्याची नियमित जबाबदारी विभागीय रेल्वेवर असेल. हे मार्ग ठरवताना खालील बाबी विचारात घेतल्या जातील:
- दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या देशाच्या महत्वाच्या शहरांदरम्यान जोडणी.
- राज्यांच्या राजधानी वा महत्वाच्या शहरांपासून राज्यातील सर्व भागातील महत्वांच्या शहरांदरम्यान जोडणी.
- देशाच्या इशान्य भागाशी कनेक्टीविटीची खात्री.
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा, ते मुबलक असलेल्या प्रदेशांकडून (उदा. गुजराथ, आंध्रप्रदेश) जास्त मागणी असलेल्या प्रदेशांकडे पुरवठा.
- इतर महत्वांच्या वस्तू ( कृषी निविष्ठा, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांचे उत्पादक असलेल्या प्रदेशांकडून देशाच्या इतर भागात पुरवठा.
यानुसार 14.04.2020 रोजी 18.00 वाजेपर्यंत अश्या सत्त्याहत्तर (77) गाड्या सोडण्यात आल्या, त्यापैकी पंच्याहत्तर (75) गाड्या या विशेष वेळापत्रकानुसार पार्सल विशेष गाड्या होत्या. 1835 टन सामुग्री भरलेल्या या गाड्यांमुळे रेल्वेला एका दिवसाचे 63 लाख उत्पन्न मिळाले, यानुसार सुरुवातीपासून ते 14.04.2020 रोजी 18.00 वाजेपर्यंत अश्या 522 गाड्या धावल्या, त्यापैकी 458 गाड्या या विशेष वेळापत्रकानुसार पार्सल विशेष गाड्या होत्या. 20,474 टन सामुग्री भरलेल्या या गाड्यांमुळे रेल्वेला एका दिवसाचे 7.54 कोटी उत्पन्न मिळाले.