Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २० एप्रिलपासून मोबाईल फोन आणि काही इलेक्ट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे. टाळेबंदीच्या  सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या, यात ही परवानगी देण्यात आली.

यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरून मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत. या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version