नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या रमजान महिन्यासाठी, मुस्लिम विचारवंतांनी आणि मशिदींमधल्या इमामांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रमजान काळात मशिदींमध्ये जाऊ नये, घरीच नमाज अदा, कुराण पठण आणि इफ्तार हे मुस्लिम बांधवांनी घरातच करावं, इफ्तार मेजवानीचं आयोजन करू नये, गरिबांना अन्न, तसंच पैशाची मदत करावी, सरकारच्या टाळेबंदीच्या सूचनांचं पालन करूनच रमजानच्या काळात खरेदी करावी यांसारख्या मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. मुस्लिम समाजानं या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे.