नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे.
५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे. कामगारांसाठी सॅनिटायझर आणि ताप मोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षित अंतर पाळून काम करता येईल अशी सोय व्यवस्थापन करावी तसंच कामगारांच्या दोन पाळ्यांमध्ये किमान एका तासाचं अंतर ठेवण्याची सुचना सरकारनं केली आहे.