नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज २७३ अंकांनी वधारला आणि ९ हजार २६७ अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातली तेजी आणि कोरोनामुळॆ उद्भवलेली आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज केलेल्या उपाययोजनेचा सकारात्मक परिणाम आज चलन विनिमय बाजारात दिसून आला.
डॉलरच्या तुलनेत आज सकाळी आतापर्यंतचा नीचांक नोंदवणारा रुपया संध्याकाळी ४८ पैशांनी वधारला आणि त्याचं मूल्य प्रति डॉलर ७६ रुपये ३९ पैसे झालं.