Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी

अतिरिक्त औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट

१० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा

मुंबई : राज्य शासनाने लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून, यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे. राज्य शासकीय कार्यालयांमध्ये १० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे.

कोविड सर्वसमावेश अधिसूचना वाचण्यासाठी क्लिक करा https://bit.ly/3cqhx4n

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाच्या जारी झालेल्या नव्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील बाबी खालीलप्रमाणे –

राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वस्तू आणि मालाची ने-आण करण्यास परवानगी

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याला परवानगी 

खालील व्यावसायिक आणि खाजगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी 

      नगरपालिका आणि महानगरपालीका क्षेत्राच्या बाहेरील भागातील ग्रामीण भागातील उद्योग.

       ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देता येईल.

      या उद्योगांसाठी काही नियम असतील. यात उद्योगांना आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागेल. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने आण करण्यास मनाई असेल.

      जीवनावश्यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व आधारित उत्पादन करणारे उद्योग

      सर्व प्रकारचे कृषी, फलोत्पादन व कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतुक उद्योग

      उत्पादन एकक, ज्यात प्रक्रिया सातत्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा साखळीतील उद्योग

      आय टी हार्डवेअर उत्पादन

      कोळसा उद्योग, खाण आणि खणीज उद्योग, (सुक्ष्म खणीजांसह),  त्याची वाहतुक. खाणींसाठी आवश्यक असलेल्या विस्फोटकांचा पुरवठा

      पॅकेजिंग उद्योग

      ऑईल आणि गॅस एक्स्प्लोरेशन / रिफायनरी

       ग्रामिण भागातील विट भट्ट्या

      गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबधीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग

Exit mobile version