नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेले सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबड़े यांची एनआयए कोठडी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं २५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आनंद तेलतुंबड़े यांनी १४ एप्रिलला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेपुढं आत्मसमर्पण केलं होतं. तिथं एनआयएनं त्यांना अटक केली होती.
तपास अजून पूर्ण झाला नसल्यानं तेलतुंबड़े यांना आणखी सात दिवस ताब्यात ठेवणं आवश्यक असल्याचं एनआयएनं आज न्यायालयाला सांगितलं. त्यानुसार न्यायालयानं तेलतुंबड़े यांची कोठडी वाढवली.