नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.
यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना राज्य सरकारनं कामगार आयुक्त तसंच इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना केली आहे.
टाळेबंदीमुळे या कामगारांना काम नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा घरीच थांबावं लागलं आहे, त्यामुळे त्यांच्या रोजंदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक अडचणींना या कामगारांना सामोरं जावं लागत असल्यामुळे राज्य सरकारनं या कामगारांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा फायदा राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.