नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन जिल्ह्यांमधे गेल्या २८ दिवसात, तर २३ राज्यांमधल्या ४५ जिल्ह्यांमधे गेल्या १४ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचीव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली.
पुदुचेरीतल्या माहे, आणि कर्नाटकातल्या कोडागू या जिल्ह्यांमधे गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ३ पूर्णांक ३ दशांश टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रॅपिड अँटीबॉडी चाचण्या फक्त हॉटस्पॉट क्षेत्रातच व्हाव्यात, असं ते म्हणाले.
लॉकडाऊनत्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सह सचीव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी दिली.