Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं  राज्यात ५५ विशेष रुग्णालयं अधिसूचित केली आहेत. त्यामुळे कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट झाली असून एकूण ६ हजार ६६० खाटा  उपलब्ध आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्य सरकारनं ३० शासकीय रुग्णालयं  कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयं  म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागानं नव्यानं  आठ, तर वैद्यकीय शिक्षण विभागानं  १७ रुग्णालयं  अधिसूचित केली आहेत. त्यामुळे आता अतिरीक्त ४ हजार ३५५ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.  संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणं  या रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे. असं टोपे यांनी सांगितलं.

Exit mobile version