Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या २९ परदेशी नागरिकांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत निजामुद्दीन इथं धार्मिक कार्यक्रमासाठी आलेले २९ परदेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून अहमदनगरमध्ये राहिल्यानं त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनेई या देशांतील हे नागरिक आहेत.

या परदेशी नागरिकांना रुग्णालयातून सोडल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जात आहे.

हे नागरिक अहमदनगर जिल्ह्यात मुकुंदनगर, जामखेड, नेवासा इथ धार्मिकस्थळी राहिले होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेतलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यांना अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यासाठी मदत करणाऱ्यांविरूद्ध याआधीच गुन्हा नोंदवला आहे.

Exit mobile version