नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
मोसंबी बाजारपेठेत नेन्यासाठी वाहन उपलब्ध नाहीत, माल खरेदी करणारे व्यापारी पुढे येत नसल्यामुळे मोसंबी बागेतच पिकून सडून चालल्या आहेत.
राज्य शासनानं अशा मोसंबी बागांची पाहणी करून पंचनामे करावेत, फळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान द्यावं अशी मागणी या भागाचे नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे.