Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रमजानच्या काळात घराजवळ फळे मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जगभरातल्या मुस्लीम बांधवांनी या काळात गर्दी करणं टाळावं, या सणादरम्यान गर्दी होऊ शकेल असे धार्मिक सोहळे रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा गांभीर्यानं विचार करावा असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
यासंदर्भात संघटनेनं मार्गदर्शक तत्व जारी केली असून, दूरचित्रवाणी तसंच इतर डिजीटल किंवा समाज माध्यमांचा वापर करून हे सोहळे आणि प्रार्थना व्हर्चुअली कराव्यात असं आवाहन त्यात केलं आहे. याबाबत जगभरातल्या मुस्लीम धर्मगुरुंनी लवकरात लवकर नियोजनपूर्वक निर्णय घ्यावेत.
Exit mobile version