Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. आरके पूरम मधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या महिना अखेरीला, अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे आंतरराष्ट्रीय स्पेस सेटलमेंट डीझाईन मधे हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रावर अधिक लक्ष पुरवण्यात येणार असून, युवकांनी नवे शोध आणि कल्पकतेसह पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंतराळ हे सर्वांसाठी सामायिक संसाधन असून, त्याचे लाभ घेण्याची संधी सर्व राष्ट्रांना उपलब्ध राहिली पाहिजे असे सांगून, या संदर्भातल्या प्रयोगाचे लाभ सर्व देशांना उपलब्ध राहावेत याकडे लक्ष पुरवले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

सामाजिक लाभ आणि जनतेचे जीवनमान उंचावणे हा विज्ञानाच्या प्रगतीचा मुख्य उद्देश आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या लाभामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करतानाच कृषी क्षेत्रासारख्या क्षेत्रांमधे सुधारणा घडवण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

1975 मध्ये आर्यभट्ट प्रक्षेपित केल्यापासून भारत अंतराळ संशोधनात आघाडीवर असल्याचेही नायडू यांनी सांगितले.

Exit mobile version