Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पोलीसांनी बनविले खास “संजीवनी सॅनिटायझिंग वाहन”

भोसरी : भोसरी बीआरटी (टर्मिनल) बसस्थानक येथे कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, दररोज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्तासाठी असलेले पोलीसांना व भोसरी स्थानकांमध्ये असलेले वाहक चालक, तसेच येथील अधिकाऱ्यांसाठी पोलीसांनी बनविले खास “संजीवनी सॅनिटायझिंग वाहन” या वाहनामधून माणुसकीच्या नात्याने सॅनिटायझर करून घेताना, पोलीस कर्मचारी श्री. सुरेश कर्णे व श्री.आनंद बनसोडे व पीएमपीएमएलचे अधिकारी श्री.काळुराम लांडगे, श्री.मल्हारी काळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

तसेच ह्या बंदच्या काळात अत्यावशक दुकाने सोडून इतर काही हॉटेल दुकाने बंद असल्यामुळे “स्विट काॅर्नर टी “च्या वतीने दिपक चौधरी यांच्याकडून घरामधून रोज चहा बनवून, भोसरी बीआरटी बसस्थानकामध्ये पोलीस व पीएमपीएमएलच्या कर्मचारी यांना त्यांच्यातर्फे चहा देण्यात येतो, त्यामुळे सर्व कर्मचारी बंधुकडून समाधान व्यक्त केल जात आहे.

Exit mobile version