नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या ७ मे ते ७ जून २०२० या महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू असलेली संचारबंदी ३ मे ला संपली, तर मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई, औरंगाबाद, आणि नागपूर खंडपीठं उन्हाळी सुट्ट्या न घेता कामकाज सुरु करतील.
याशिवाय न्यायालयाचं कामकाजही नेहमीच्या सकाळी ११ वाजेऐवजी अर्धा तास आधी साडे दहा वाजता सुरु होईल, असं उच्च न्यायालयांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र ३ मे नंतरही संचारबंदी कायम राहिली तर न्यायालयाचं कामकाज सध्या सुरु असलेल्या पद्धतीनुसारच सुरु राहणार आहे.