नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं अमेरिकेत ४० हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून साडे सात लाखापेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे.
या अदृश्य शत्रुच्या हल्ल्याच्या पार्शवभूमीवर, अमेरिकी नागरिकांच्या रोजगाराचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा आदेश जारी करत असल्याचं ट्रंप यांनी म्हटलंय.