Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाची मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या चाचणी किंवा उपचारादरम्यान निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशातली सर्व रुग्णालये, विलगीकरण कक्ष, नमुना संकलन केंद्र, तसंच चाचणी प्रयोगशाळांनी या दिशानिर्देशांचं पालन करणं आवश्यक आहे.
हा कचरा दुस्तर पिशव्यांमधे गुंडाळावा, त्याच्या टोपल्यांवर कोविड 19 असं लेबल लावावं, विलगीकरण कक्षातला जैव कचरा वेगळा करावा, त्यावर जंतुनाशकाची फवारणी करावी इत्यादी सूचनांचा त्यात समावेश आहे. एच 1 एन 1 च्या धर्तीवर सध्या या सूचना जारी करण्यात आल्या असून आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल करु, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.
Exit mobile version