Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाकिस्ताननं मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारासह अनेकांची नावं दहशतवाद्यांच्या यादीतून वगळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या यादीतून सुमारे अठराशे दहशतवाद्यांची नावं वगळली आहेत. अमेरिकेतल्या एका तंत्रज्ञान कंपनीनं ही माहिती दिली असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या यादीतून मुंबईत २००८ साली झालेल्या दहशदवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर झाकी उर रहमान याचं नावही काढून टाकलं असल्याचं या संदर्भातल्या वृत्तात म्हटलं आहे.

आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणारी एफ.ए.टी.एफ. ही संस्था लवकरच पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याविषयीचा पुन्हा एकदा आढावा घेणार होती. त्यापूर्वीच पाकिस्ताननं ही कृती केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. दहशतवाद्यांची ही यादी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणानं तयार केली होती. यात २०१८ ला ७ हजार ६०० जणांचा समावेश होता. मात्र गेल्या दीड वर्षात पाकिस्ताननं या यादीतल्या लोकांची नावं वगळणं सुरु केल्यानंतर आता या यादीत केवळ ३ हजार ८०० जणांची नावं उरली असल्याचंही या संदर्भातल्या वृत्तात म्हटलं आहे.

Exit mobile version