पुणे : राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या कार्यालया अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड) कडून दि. 22, 23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोरोना (कोविड 19) महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. असे जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्डाचे सचिव तथा राज्य शासनाच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.