२० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द
अलिबाग : पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून ओएनजीसी, उरण यांच्याकडून जिल्ह्यातील गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याच्या मदतीसाठी 20 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणिजिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.