नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून कोरोना विषाणूची लागण झालेला एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. तर ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाग्रस्त आढळून आलेला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
संचारबंदी सुरू होऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. या दरम्यान देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडण्याची टक्केवारी जवळपास एकसमान आहे. या कालावधीत चाचण्यांचे प्रमाण २४ पट तर रुग्णांचे प्रमाण १६ पट झाल्याची माहिती केंद्र सरकारने रुग्णालयं, विलगीकरण सुविधांसाठीच्या तज्ञ समितीचे प्रमुख सी. के. मिश्रा यांनी दिली.