नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचा प्रारंभही ते यावेळी करतील. स्वामित्व योजनेलाही प्रधानमंत्र्याच्या हस्ते यावेळी सुरुवात होणार आहे.
प्रधानमंत्री येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर ही तिसरी बैठक असेल. लॉकडाऊन लावण्यापूर्वी तसंच वाढवण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.