Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्थलांतरितांना गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे शक्य नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी केंद्र सरकारनं जर विशेष रेल्वेची व्यवस्था केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो, त्यामुळे हे शक्य नाही, असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांसाठी विशेष रेल्वेची मागणी केली होती त्यावर  गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं.

या मजुरांना त्यांच्या गावी नोकऱ्या नाहीत ते नोकऱ्यांसाठी मुंबई आणि पुण्यात येतात त्यामुळे त्यांना इथेच राहू द्यावं, असही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version