Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली.

देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

Exit mobile version