Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दीड वर्ष जैसे-थे राहणार, थकबाकीही मिळणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे उद्भवलेल्या आर्थिक ताणामुळे केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ स्थगित ठेवली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२० पासून देय असलेली महागाई भत्त्यातली वाढ केंद्र लरकारच्या कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतनधारकांना मिळणार नाही. त्याचप्रमाणे १ जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मध्येही महागाई भत्त्याचा दर वाढणार नाही.

सध्या आहे त्याच दराने महागाई भत्ता मिळत राहील. जुलै २०२१ मध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय सरकार घेईल. तेव्हा आधीच्या या तिन्ही टप्प्यांसाठीचे अपेक्षित दरही विचारात घेतले जातील, आणि तो दर जुलै २०२१ पासून दिला जाईल. मात्र मधल्या काळातली थकबाकी दिली जाणार नाही.

Exit mobile version