नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परकीय चलन विनिमय बाजारात आज रुपया तब्बल ६२ पैशांनी वधारला. विनिमय दर प्रतिडॉलर ७६ रुपये ६ पैसे राहिला.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ४८४ अंकांची वाढ झाली, आणि तो ३१ हजार ८६३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १२७ अंकांची वाढ झाली, आणि तो ९ हजार ३१४ अंकांवर बंद झाला.