नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपीनं उपचार करायला, तसंच तपासणीसाठी पुल टेस्टींगची पद्धत वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज दुपारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्री आणि सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरु करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे, त्यालाही आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं टोपे यांनी सांगितलं.