नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत वाणिज्य महासंघ, विविध क्षेत्रांतले उद्योग, प्रसारमाध्यमे यांच्या प्रतिनिधींशी आणि अन्य भागधारकांशी संवाद साधला.
“कोविड-१९ पश्चात भारतातली आव्हानं आणि नवीन संधी” हा या संवादसत्राचा विषय होता. कोरोना साथीच्या काळात सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल चर्च करत त्या प्रतिनिधींनी यावेळी काही सूचना मांडल्या.
शासनानं काही उद्योगांना काम सुरु करण्याची मुभा दिली असली तरी, कोरोनाचा फ़ैलाव होणार नाही त्यादृष्टीनं सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जबाबदारी त्या उद्योगांची राहील, असं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यातल्या प्रलंबित रेल्वे मार्गांना गती देण्याची ग्वाही रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली आहे. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे घेण्यात आलेल्या, ‘कोरोना नंतरचा भारत: आव्हान आणि संधी’ या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते.