Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे वितरण सुरळीतपणे सुरु असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

एप्रिल महिन्याचे अन्नधान्य एकूण 5 लाख 48 हजार 418 कार्डधारकांपैकी दिनांक 25 एप्रिल 2020 अखेर एकूण 5 लाख 45 हजार 263 कार्डधारकांना वाटप पूर्ण केलेले आहे. वाटपाची टक्केवारी 99.42 टक्के आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर दि. 10 एप्रिल 2020 पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरिबकल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळाची एफसीआय मधून 13 हजार 377 मे.टन संपूर्ण तांदूळाची प्रत्यक्षात उचल करण्यात आलेली आहे व 24 एप्रिल 2020 अखेर 5 लाख 10 हजार 287 कार्डधारकांना 12,188.366 मे.टन धान्य प्रत्यक्षात वाटप केलेले आहे. वाटपाची टक्केवारी 93.04 टक्के इतकी आहे.

अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश नसलेल्या 2 लाख 88 हजार 292 केशरी कार्डधारकांच्या 13 लाख 76 हजार 497 लाभार्थी संख्येस एकूण 6883 मे.टन धान्याचे दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी अन्नधान्य मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी 4341 मे.टन धान्य उचल करण्यात आले असून उर्वरीत धान्याची उचल 25 एप्रिल 2020 पर्यंत करण्यात येवून दि. 26 एप्रिल 2020 पासून माहे 5 मे 2020 या कालावधीमध्ये ए.पी.एल. केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. सदरचे धान्य पावतीव्दारे रजिस्टरवर नोंद करुन वाटप करण्यात येईल. त्यासाठी शिधापत्रिका धारकाचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. ज्यांच्या केशरी शिधापत्रिका नाहीत त्यांना अन्नधान्य या योजनेतून देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ए.पी.एल.केशरी शिधापत्रिका एका ठराविक रास्तभाव दुकानांना जोडलेले असल्याने त्या शिधापत्रिकाधारकांना ज्या स्वस्त धान्य दुकानास जोडलेले आहे त्याच स्वस्त धान्य दुकानातून या योजनेचा लाभ मिळेल. अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांमधून संगणक प्रणालीव्दारे ज्या लाभार्थ्यांनी अन्नधान्य घेतलेले आहे त्यांना वगळून इतर केशरी शिधा पत्रिकाधारक धान्य मिळण्यास पात्र असतील. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये यादृष्टीने अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा ठसा न घेता त्याऐवजी सदर शिधापत्रिकेतील कुटुंबप्रमुखाचा अथवा अन्य सदस्याचा आधार क्रमांक घेऊन धान्य वितरीत करण्यात येईल.

पुणे ग्रामीणमधील 13 तालुक्यात एकूण 60 शिवभोजन केंद्र दिनांक 25 एप्रिल 2020 अखेर कार्यान्वित आहेत. 7 हजार 150 थाळयांचे उदिदष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी 5 हजार 667 थाळयांचे वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे जिल्हा (ग्रामीण) मध्ये जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नाही. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धान्याचा अपहार व अनियमिततेबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत त्याअनुषंगाने पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील सर्व तहसीलदारांना तक्रारींच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच प्रत्येक दुकानामध्ये प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या असून एकूण 19 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 4 परवाने रद्य, 3 परवाने प्रकरणी दंडनीय कारवाई, 11 परवाने निलंबित व धान्याच्या तफावतीची रक्क्म शासनजमा करण्याचे आदेश व 1 परवान्याची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करुन सक्त ताकीद देण्यात आलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी कळविले आहे.

Exit mobile version