Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयटीसीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा

मुंबई : आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसेच गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे.

या दातृत्वभावातूनच आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत.

समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.  ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तू रुपाने तर कुणी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करत आहे. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचे कोंदण आहे म्हणून त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे.

या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाखमोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सर्व जनतेचे आभार मानले आहेत. त्यांच्या मदतीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.  यापुढे ही अशाच सहकार्याची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करतांना आपण सर्वजण मिळून कोरोनाविरुद्धचे हे युद्ध नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे

Exit mobile version