नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढतं आहे. महिनाभरापूर्वी देशात लॉकडाउन लागू केलं तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रुग्ण बरे झाले होते. म्हणजे हे प्रमाण त्यावेळी ७ टक्के होतं.
आता देशभरात कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ५०६ वर पोचली असून, त्यापैकी ५ हजार ६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण २० पूर्णांक ६६ शतांश टक्के झालंय.
तर अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यामधे सर्व रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसतं.