Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या ३ मे नंतर लॉक डाउन टप्प्या टप्प्यानं कसा मागे घेता येईल, याबाबत यावेळी चर्चा होण्याची  शक्यता आहे.

देशात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर प्रधानमंत्री तिसऱ्यांदा संवाद साधणार आहेत.

Exit mobile version