नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना सहाय्यता योजने अंतर्गत, प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा, केंद्र सरकारनं केला आहे.
या योजनेसाठी अमुक एका संकेतस्थळाला भेट द्या, अर्ज करा आणि मदत मिळवा, ही संपूर्ण माहिती खोटी आहे, हे संकेतस्थळही बनावट आहे, तेव्हा याकडे दुर्लक्ष करुन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा, असं आवाहन सरकारनं केलं आहे. अशाप्रकारची कुठलीही योजना चालवली जात नसल्याचही, सरकारनं स्पष्टं केलं आहे.