नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारी लंडनमधल्या १० डाउनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या कार्यालयात कामावर रुजू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेले तीन आठवडे ते रुग्णालयात उपचार घेत होते. डाउनिंग स्ट्रीट इथल्या सरकारी प्रवक्त्यानं ही माहिती दिली.
दरम्यान चीनमध्ये वुहान इथं रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पहिल्यांदाच शून्यावर आली असून वुहान शहरासाठी कोरोना विरोधातल्या लढाईत हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. ७६ दिवसांच्या लॉक डाऊन नंतर गेल्या ८ एप्रिल रोजी वुहान शहरातले निर्बंध हटवण्यात आले होते.