नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या ओणी गावातले अनेक जण संचारबंदीमुळे मुंबईत अडकून पडले असून त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला.
गावी राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर चाकरमान्यांची उपासमार होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी मुंबईत राहणाऱ्या लोकांची यादी तयार केली. गावातून दोन टन तांदुळ आणि एक टन डाळ असा शिधा गोळा करत प्रत्येकी पाच किलोची पाकिटं तयार केली आणि वाहतुकीची आवश्यक ती परवानगी घेऊन ती पाकिटं मुंबईकर चाकरमान्यांना पाठवून दिली.
मुंबईतला रेड झोन वगळता इतर भागातल्या सुमारे पाचशे गरजू चाकरमान्यांना या पाकिटांचं वितरण करण्यात आलं आहे.