Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे विभागात 19 हजार 534 गरजूंना शिवभोजन थाळी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : शासनाच्याे निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या. पार्श्व भूमीवर गरीब व गरजू लोकांना अन्नस मिळावे म्हिणून शिवभोजन थाळी सुरु करण्या्त आली आहे. पुणे विभागात 19 हजार 534 गरजू नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयात 7 हजार 500, सातारा जिल्हयात 2 हजार 500, सांगली जिल्हयात 2 हजार 250, सोलापूर जिल्हयात 4 हजार 200 व कोल्हापूर जिल्हयात 3 हजार 600 गरजू व्यक्तींनी या भोजन थाळीच्या माध्यमातून भोजन घेतले आहे. 18 हजार 750 व्यक्तींची तरतूद असताना काल 19 हजार 534 नागरिकांनी भोजन घेतले असून थाळयांच्या संख्या मर्यादित असली तरी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जास्त नागरिकांनाही भोजन देण्यात येत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Exit mobile version