पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख
Ekach Dheya
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बिडकीनमधे एका धार्मिकस्थळी जमलेल्या गर्दीची पाहणी करायला गेलेल्या पोलिसांवर काल दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतलं आहे.
टाळेबंदी सुरू झाल्यापासून पोलिसांवर हल्ल्याच्या १५९ घटना घडल्या असून या प्रकरणी ५३५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.