पिंपरी : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक आकुर्डी येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबध्द व सर्वांगिण विकास आदी विषयाबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, आ.बाबुराव पाचरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत अध्यक्ष खाडे यांनी तर प्रकल्पांच्या स्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी सविस्तर माहिती. प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत पालकमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.