नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे.
लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल, असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करण्याची सक्ती न करण्याचा, तसंच आपल्या इच्छेनुसार अभ्यास करू देण्याचा सल्लाही मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी पालकांना दिला आहे.