Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी  देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे.

कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७ हजार किलोमीटर प्रवास केला असून, ७४८ टनांहून अधिक साहित्य वाहून नेलं आहे.

पूर्व आशियाई देशांबरोबर निर्माण करण्यात आलेल्या हवाई सेतूच्या माध्यमातून औषधं, वैद्यकीय  उपकरणं आणि अन्य साहित्याची वाहतूक होत असल्याचं नागरी उड्डयन मंत्र्यालयानं म्हटलं आहे.

Exit mobile version