दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांच्या पगारात कपात करू नये – रामदास आठवले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स, डॉक्टर तसेच मनपा सफाई कामगार यांच्या पगारात कपात करू नये पगारात कपात करू नये, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
दाट झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना अधिक प्रमाणात पसरत आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी दाट झोपडपट्ट्यांमध्ये होम कॉरन्टाईन केलेल्या लोकांची व्यवस्था त्यांच्या झोपडपट्टीच्या जवळ असणाऱ्या शाळांमध्ये करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.