Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरोग्य कर्मचाऱ्यांना हायड्रोक्लोरोक्विन देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या त्याचप्रमाणे या रुग्णांच्या संपर्कातयेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक हायड्रोक्लोरोक्विन औषध देण्याबाबत राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य सचिव प्रदिप व्यास यांनी याबाबतचे आदेश दिले असून या द्वारे हे औषध उपचार करणाऱ्यांबरोबरचं कोविड रुग्णांचे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसचं कोविड संसर्ग असलेल्याविभागातल्या सर्व रुग्णालयातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.

संसर्गित रुग्णांच्या संपर्कातआलेल्यांनाही हे औषध दिले जाणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांना सात आठवडे तर संपर्कात आलेल्यांना तीन आठवडे हे औषध घ्यावे लागणार आहे. पंधरा वर्षाच्या खालील व्यक्तीलाहे औषध देऊ नये त्याचप्रमाणे औषध घेणाऱ्यांना त्याची पूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीनेच हे औषध देण्याच्या सूचनाही या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या आहेत. हद्यरोग,उच्च रक्तदाब आणि मधूमेह असलेल्या व्यक्तींनाही हे औषध दिले जाणार नाही.

Exit mobile version