टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना १७ हजार ९८६ कोटी रूपयांचं वितरण – नरेंद्रसिंग तोमर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध असून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ७१ हजार कोटी रूपये जमा केले असल्याची माहिती केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज दिली. टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना १७ हजार ९८६ कोटी रूपये वितरित केले असल्याचंही ते म्हणाले.
देशात अन्नधान्याचा कोणताही तुटवडा नसून दूध आणि भाजीपालाही उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात ५७ लाख ७ हजार हेक्टर जमिनीवर उन्हाळी पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहितीही त्यांनी आज दिली. यावर्षी पर्जन्यमान सामान्य राहील, असा अंदाज असल्यानं देशात अन्नधान्याचं उत्पदन सरासरीपेक्षा अधिक होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.