बियाणे, खते, किटकनाशके व इतर शेतमाल उत्पादन वाहतुक व विक्रीला मुभा
Ekach Dheya
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. तथापी बियाणे यामध्ये अन्नधान्य, फळे, भाजीपाला बियाणे व उतिसंवर्धित रोपे, कलमे इ. सर्व जे पेरणी /लागवडीसाठी वापरतात यांचा समावेश होतो. खते यामध्ये संद्रीय, असेंद्रीय व मिश्र खतांचा समावेश होतो. अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 मध्ये समाविष्ट असल्याने पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांची आवश्यकतेमुळे शेतक-यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन, वाहतुक व विक्री ही अत्यावश्यक सेवेत असून त्यांना संचारबंदीतून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे.
सर्व अधिनस्त कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील बियाणांचे 2136, खतांचे 2402 व किटकनाशकांचे 2198 असे एकूण 6736 अधिकृत परवाना धारक विक्रेत्यांना कळविण्यात आले असून सर्व विक्री केंद्रे त्याचे स्थानिक प्रशासनाकडील नियमांनुसार सुरळीत चालू आहेत.
जिल्ह्यामधील एमएआयडीसी उति संवर्धित रोपे तयार करणारे खाजगी युनिट, बियाणे खते व किटकनाशके उत्पादन करणारे खाजगी उद्योजक ठिंबक सिंचन संच तयार करणा-या कंपन्या तसेच विमा कंपन्यांना त्यांनी या कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे आजअखेर 49 कंपनीना उत्पादन व विक्री परवानगी पत्र तसेच वाहतुकीसाठी 76 पास देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यामधील स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांनी त्यांनी या कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे व हवामान डेटाबेस अखंडीत चालु राहणे आवश्यक असल्याने परवानगी देण्यात आली आहे.
तसेच त्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध/नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे व सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणेच्या सुचना दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी दिली आहे.