Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करून तसेच दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखून आणि चेहऱ्यावर मास्क धारण करून अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विकास गजरे यांच्यासह मोजके वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version