Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता

दाट लोकवस्तीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्राधान्य – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांना आवश्यकत भासल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होईल, अशी नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितले.

आरोग्यमंत्री टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यातील महत्वाचे मुद्दे असे :

•     राज्यातील कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. कालपर्यंत १७७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले.

•     कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होऊन तो ३.५ टक्के एवढा झाला आहे.

•     राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा देशाच्या सरासरी वेगा पेक्षा जास्त आहे.

•     राज्यात ४५ प्रयोगशाळा कार्यरत. त्यात २५ शासकीय २० खासगी प्रयोगशाळा आहे. दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्यांची क्षमता

•     राज्यात ७३३ कंटेनमेंट झोन. १० हजार सर्वेक्षण पथके कार्यरत तर ४३ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण

•     लवकर निदानासाठी पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर चाचणी उपयुक्त. याद्वारे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावरून कोरोनाचा प्राथमिक अंदाज घेणे शक्य.

•     राज्यात केंद्राच्या निकषानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण. केंद्र शासनच्या सूचनेनुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ ऑरेंज आणि ६ जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत.

•     मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दाट लोकवस्तीचे शहर असल्याने विशेष उपाययोजना आवश्यक.

•     मालेगाव मधील खासगी क्लिनीक १०० टक्के सुरू करण्यावर भर. क्लिनिक सुरू न केल्यास त्याचा परवाना रद्द करणार.

•     मालेगामध्ये खासगी आणि शासकीय फिव्हर क्लिनीक सुरू करण्याचे निर्देश

•     खासगी डॉक्टरांना पीपीई कीट देखील पुरविण्यास शासन तयार. कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार मिळणे आवश्यक

•     मालेगाव येथील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार त्यासाठी परिसरातील लोकांची मदत घेणार

Exit mobile version